कोल्हापूर प्रतिनीधी:
कोल्हापूर महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण ( के.एम .सी) कॉलेज, मध्ये २00५ पासून बेकायदेशीर रित्या कार्यरत असणारे श्री.शेख व श्री.दामुगडे यांना शिक्षक म्हणून मान्यता देण्याबाबत प्रस्ताव मागणीच्या ठरावास निषेध करण्यासाठी के . एम.सी कॉलेज मधील प्रा. तोरस्कर,प्रा-कांबळे व प्रा.पाटील यांनी दि.११.0३.२0२२ रोजी शिवाजी विद्यापीठा समोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले श्री. शेख व श्री .दामुगडे यांच्या के. म.सी कॉलेज मधील बेकायदेशीर समावेशनास शिवाजी विद्यापीठाने २005 पासून आज अखेर मान्यता दिलेली नाही. शेख व दामुगडे यांच्या मा . मुंबई उच्च न्यायालयातील याचिका दि.0७.0३.२00५ रोजी Dismiss होऊन निकालात निघाल्या.त्यामुळे कायदेशीर दृष्टया ते शिक्षकच नाहीत विद्यापीठाची मान्यता नसताना त्यांना बेकायदेशीररित्या शासन अनुदानातून दिलेल्या वेतनाची वसूली करण्याबाबत व याबाबत तत्कालीन प्राचार्य डॉ . एस . एस .गवळी यांची चौकशी करण्याबाबत मा . विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) कोल्हापूर यानी मा .आयुक्त ,को म.न.पा. यांना कळविलेले आहे. आजरोजी श्री.शेख व श्री.दामुगडे यांच्या समावेशनाची बाब न्यायप्रविष्ठ आहे, असे असताना त्यांच्या मान्यतेसाठी कॉलेजकडून प्रस्ताव मागण्याचा ठराव शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने करणे हे पूर्णत: बेकायदेशीर व विद्यापीठ नियमाविरोधी आहे. सदर उपोषणास शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे पदाधिकारी प्रा.डॉ .डी.एन.पाटील, प्रा .सुधाकर मानकर,व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा .डॉ.प्रकाश कुंभार, सिनेट सदस्य- डॉ. अरूण पाटील,डॉ .ईला जोगी, डॉ.मनोज गुजर, डॉ. राजेंद्र थोरात, डॉ. एन.के.खंदारे, प्रा .डॉ . डी .आर.भोसले, डॉ.अशोक कोरडे, डॉ. संतोष जेठीथोर, प्रा सुनिता अमृतसागर ् प्रताप कुपले, प्रसाद कापसे इत्यादीनी उपोषण स्थळी भेट दिली