कोल्हापूर प्रतिनीधी केंद्रीय गृहमंत्रालयाने नैसर्गिक वायूच्या किमतीसंदर्भात सुधारित फॉर्म्युला मंजूर केला असून त्यामुळे त्याच्या किमतीवर देखील मर्यादा येतील. सरकारच्या या निर्णयामुळे सीएनजी आणि स्वयंपाकाच्या पाइप गॅसच्या किमती दहा टक्क्यांनी कमी होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीने ओएनजीसी/ ओआयएल, नवीन अन्वेषण परवाना,धोरण (एनईएलपी) ब्लॉक्स आणि प्री-एनईएलपी ब्लॉक्समधून उत्पादित गॅससाठी मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी दिली आहे. अशा नैसर्गिक वायूची किंमत इंडियन क्रूड बास्केटच्या मासिक सरासरीच्या १०% असेल आणि मासिक आधारावर ती अधिसूचित केली जाईल.भारतातील प्राथमिक ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा वाटा सध्याच्या ६.५ टक्क्यांवरून २०३० पर्यंत १५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केली आहे. या सुधारणांमुळे नैसर्गिक वायूचा वापर वाढण्यास मदत होईल .
या सुधारणांमुळे घरगुती नॅचरल गॅस (पीएनजी) आणि वाहतुकीसाठीच्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) किमतीमध्ये लक्षणीय घट होणार आहे. कमी झालेल्या किमतीमुळे खतांच्या सबसिडीचा बोजाही कमी होईल आणि देशांतर्गत वीज क्षेत्राला मदत होईल.