कोल्हापूर प्रतिनीधी : शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख नेते व अर्ज दाखल केलेले उमेदवार यांची कृषी उत्पन्न बाजार समिती संदर्भात शेतकरी कामगार पक्ष कोल्हापूर शहर कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई कुमार जाधव होते.
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लढवाण्याबाबत निर्धार करण्यात आला. त्यानुसार पक्षाच्या वतीने सर्व गटातून अर्ज दाखल केलेले आहेत.
पक्षाचे करवीर तालुका चिटणीस भाई केरबा भाऊ पाटील यांनी निवडणूकीच्या रणणिती संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी भाई भारत पाटील आणि भाई एकनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस राधानगरी तालुका चिटणीस अंबाजी पाटील, मध्यवर्ती समिती सदस्य बाबासाहेब देवकर, अमित कांबळे, दत्ता पाटील, कुमार जाधव, संभाजी पाटील, मोहन पाटील, सचिन पाटील, तुकाराम खराडे, विष्णुपंत एकशिंगे, राजेंद्र मगदूम, पांडुरंग वाकरे, राजेंद्र देशमाने आदी मान्यवर उपस्थित होते.
