साप्ताहिक श्रमिक समाचार लाईव्ह:ऍड. उज्वला कदम यांच्या २ ऱ्या स्मृतिदिनी शेकाप तर्फे व्याख्यान

 


कोल्हापूर दि. २६: शेतकरी कामगार पक्ष कोल्हापूर महिला आघाडीच्या दिवंगत नेत्या ऍड. उज्वला कदम यांचा २ ऱ्या स्मृतिदिनी शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी कोल्हापूर च्या वतीने दिनांक २८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता कोल्हापूर शहर कार्यालयात व्याख्यानचे आयोजन करण्यात आले आहे.

     यावेळी शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा तसेच आरोग्य सेविका आशा वर्कर्स संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्षा सौ. नेत्रादिपा पाटील या 'समाजकारण आणि राजकारणातील महिलांचा सहभाग काळाची गरज' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. भारती पाटील असणार आहेत.

     कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कोल्हापूरातील महिलांना 'उज्वल गौरव' पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. यामध्ये पत्रकार अनुराधा कदम, लोकनियुक्त महिला सरपंच सौ. सरिता पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अनुषा पाटील, राष्ट्रीय खेळाडू प्राजक्ता सूर्यवंशी यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तरी सदर कार्यक्रमास शहरातील महिला, नागरिक, कार्यकर्ते  आणि शेतकरी कामगार पक्षाचे हितचिंतक यांनी उपस्थित राहाव आस आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सौ. वैशाली सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केल आहे.