साप्ताहिक श्रमिक समाचार लाईव्ह:संविधानिक राजकारण काळाची गरज - सुषमाताई अंधारे

 



संतोष कांबळे : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त कागल येथील निढोरी या  गावी सामाजिक कार्यकर्ते देवानंद नामदेव पाटील यांच्या संयोजनातून संविधान अभ्यासक तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या  ,सध्याच्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या मा.सुषमाताई अंधारे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

       तब्बल दीड तासाच्या या व्याख्यानात सुषमाताई अंधारे यांनी सध्याच्या राजकारणाची दिशा आणि दशा या विषयावर विस्तीर्ण अशी मांडणी केली. त्यांच्या या व्याख्यानासाठी ठिकठिकाणाहून खूप जनसमूह एकवटला होता. राजकारणावर बोलताना त्या म्हणाल्या," प्रत्येक ठिकाणच्या अभिजन वाद्यांचे राजकारण बंद करणे गरजेचे आहे. शिवाय इथले राजकारण संविधनिक होण्यासाठी जात - धर्म , महिला ,ओबीसी यांच्यावरील राजकारण बंद होणे गरजेचे आहे. महिलांना त्यांच्या राजकारणातील अधिकार बजावता आला पाहिजे यासाठी महिलांनी सक्षम बनणे गरजेचे आहे .' आपणही हाच उद्देश ठेवून राजकारणात उतरल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. हे बोलत असताना त्यांनी नेहमी प्रमाणेच आपल्या शैलीत विरोधकांवर निशाणे ही साधले.