पत्रकार -उत्तम कांबळे : जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत, स्थापन झालेल्या केनवडे तालुका कागल येथील FUTURISTIC SCHOOL ला जिल्हा परिषद कोल्हापूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण साहेब यांनी भेट दिली.
आजच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांना उभं करायचं असेल तर फक्त पुस्तकी ज्ञान देऊन उपयोगाचे नाही, त्यांना डिजिटल युगात समर्थपणे उभे राहता यावे म्हणून अध्ययन अध्यापनात FUTURISTIC SCHOOL सारख्या भविष्यकालीन शिक्षणाचा अंतर्भाव केला पाहिजे.... अलीकडचे विद्यार्थी तंत्रज्ञान नावाच्या वाघिणीचे दूध पिऊन जन्म घेत आहेत, त्या विद्यार्थ्यांना समर्थ शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी सुद्धा आधुनिक होणे गरजेचे आहे..... काही पालक मुलांना शिकवतात, तो वंशाचा दिवा समजून त्याला सर्व सोयी सुविधा पुरवतात पण; मुलींना फारसे शिकवताना दिसत नाहीत. आजच्या आधुनिक पालकांनी मुलगा मुलगी भेदभाव न करता मुलींना सुद्धा आधुनिक सक्षम बनवले पाहिजे तेंव्हाच शिक्षणाचा खरा हेतू साध्य होईल. FUTURISTIC SCHOOL च्या मदतीने विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत IAS, IPS, IFS असे अधिकारी होऊन यावे तसेच केनवडेची शाळा ही फक्त केनवडे च्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित न राहाता तालुका नव्हे कोल्हापूर जिल्ह्यासाठी शैक्षणिक तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला यावी अशी अपेक्षा केली.
प्रसंगी कागल चे गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कामळकर यांनी केनवडे शाळा तसेच कागल तालुका शिष्यवृत्ती व डिजिटल तालुका म्हणून नावारूपाला कसा आला याची यशोगाथा मांडली. तसेच केनवडे गावचे माजी सरपंच दत्ता पाटील यांनी futuristic क्लासरूम उभारण्यात सहकार्य लाभलेल्या सर्वांचे शतशः आभार मानून गावाप्रती असलेले कर्तव्य विषद केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री अवघडी शेळके, प्रास्ताविक श्री. सुनिल चौगुले यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री. युवराज पोवार यांनी केले.यावेळी कागल तालुका गट विकास अधिकारी सुशील संसारे साहेब तसेच ग्रामपंचायत केनवडे च्या सरपंच अनुराधा शिंदे, उपसरपंच शुभांगी पाटील, सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष पाटील, सर्व सदस्य, गावातील सर्व पक्षांचे पदाधिकारी,केनवडे शाळा स्टाफ उपस्थित होते...
