हातकणंगले प्रतिनीधी
: नियमित पीक कर्जाची परतफेड करणा-या शेतक-यांना 50 हजारांचे अनुदान मिळणा-या पहिल्या
यादीमध्ये नाव असलेल्या तसेच लाभार्थी शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण होऊनही 50 हजारा
शेतक-यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसल्याने शेतक-यांचे उपनिबंयधक कार्यालय, जिल्हा
बँकेमध्ये हेलपाटे सुरु झाले आहेत.
शासनाने तीनपैकी कोणत्याही
दोन वर्षात पीक कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतक-यांना 50 हजार रुपयांचे अनुदान
मंजूर केले आहे. या अनुदानाची पहिली यादी दिवाळीपुर्वी जाहीर झाली. पहिल्या यादीमध्ये
नाव आलेल्या शेतक-यांनी शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन आधार प्रमाणीकरण करुन घेतले. ज्या
शेतक-यांची नावे आली त्यांची आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली मात्र, या लाभार्थी
शेतक-यांच्या बँक खात्यात पैसेच जमा झाले नसल्याने लाभार्थी हवालदिल होऊन सेवा संस्था
सेक्रेटरी, उपनिबंधक कार्यालय ते जिल्हा बँक असे हेलपाटे मारत आहेत. पात्र लाभार्थींची
नावे सरकारी पोर्टलवर भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विकास सेवा संस्था सेक्रेटरी यांनी
पूर्ण केली आहे. यादीमधील बदल, यादया अदयवत करणेचे काम सेक्रेटरी यांनीच पूर्ण केले.
उपनिबंधक कार्यालयाच्या आदेशानुसार सरसकट लाभार्थी यादया पाठविण्यात आल्याने गावपातळीवरील
सर्वच क्षेत्रातील लाभार्थी यामध्ये सामील झाले आहेत.