साप्ताहिक श्रमिक समाचार लाईव्ह: चंद्रे"गावच्या लोकनियुक्त सरपंच तेजस्विनी देसाई अपात्र घोषित..!; "मासिक सभा" घेण्यात कसूर केल्याबाबत जिल्हा प्रशासनाची कारवाई

 


वार्ताहर :उत्तम कांबळे केनवडेकर  मौजे चंद्रे (ता.राधानगरी) ग्रामपंचायतची "माहे ऑक्टोबर 2020 ची मासिक सभा" घेण्यात कसूर केल्याबद्दल चंद्रे गावच्या लोकनियुक्त सरपंच तेजस्विनी महादेव देसाई यांना अपात्र घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पत्रकारद्वारे दिले आहेत.

ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणे, मासिक मीटिंग न घेता परस्पर वृत्तांत लिहिणे, ग्रामपंचायत सदस्यांना सभा वृत्तांतात व इतर कागदपत्रे दाखविणे ग्रामसेवकांना मज्जाव करणे , आपल्या जबाबदाऱ्या पार न पाडणे आदी कर्तव्यात कसूर अशी बेकायदेशीर कृत्ये केल्याचा अर्ज ग्रामपंचायत सदस्य शुभांगी भाऊसो दाभाडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे दाखल केला होता. याची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने कर्तव्यात कसूर केल्याबद्दल लोकनियुक्त सरपंच तेजस्विनी महादेव देसाई यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईचे आदेश दिले आहेत.

 मौजे चंद्रे तालुका राधानगरी ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच तेजस्विनी महादेव देसाई यांनी

 "मौजे चंद्रे ग्रामपंचायतची माहे ऑक्टोबर 2020 ची मासिक सभा" घेणे बाबत कसूर केली, असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मौजे चंद्रे तालुका राधानगरी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अपात्र असल्याचे घोषित करण्यात येत आहे. अशा कारवाईचे आदेश पत्रकार द्वारे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.