साप्ताहिक श्रमिक समाचार लाईव्ह : कळंबा कारागृह अधीक्षकावर कैद्याकडून हल्ला

 


कळंबा कारागृह अधीक्षक इंदलकर यांच्यावर आज एका कैद्याकडून हल्ला झाला आहे. जन्मठेप भोगत असलेल्या कैद्याकडून कळंबा कारागृह अधीक्षकावर हल्ला झाला. या हल्ल्यात कळंबा कारागृह अधीक्षकांच्या हाताला इजा झालीय. ही घटना बरंक तपासणीवेळी घडली आहे.

प्रशासकीय कारणामुळे रत्नागिरीहून कळंबा कारागृह आणलेल्या कैद्याने कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांच्यावर हल्ला केला. मंगळवारी सकाळी ते राउंडला गेले असता हा प्रकार घडला. त्यांच्या हाताला दुखापत झाली असून कळंबा कारागृहातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी कारागृह शिक्षा भोगणाऱ्या शर्मा नावाच्या कैद्याला प्रशासकीय कारणामुळे २५ सप्टेंबर, २०२१ पासून कळंबा कारागृहात आणण्यात आले. काही दिवसांपूर्वी येथील एका कैद्याच्या पायावर पाय दिल्याप्रकरणी त्याच्यावर कारागृह अधीक्षक इंदूरकर यांनी कारवाई केली होती. याचा राग त्याच्या मनात होता.

कारागृह अधीक्षक इंदुरकर हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे बंकर तपासणीला गेले होते, यावेळी दबा धरून बसलेल्या या कायद्याने पत्र्याच्या तुकड्याने त्यांच्यावर हल्ला केला. इंदुरकर वेळीच सावरले. आसपास उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांची सुटका केली. शर्मा याच्याकडे वॉचमनचे काम होते, यात अचानक हल्ला केला. त्याच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे कारागृह अधीक्षक इंदुरकर यांनी सांगितले.