अकबर मोहल्ला, शिवाजी चौक, शाहू टॉकीज, महापालिका परिसरात जयश्री जाधव यांना 4386 मते आणि सत्यजित कदम यांना 2432 मते मिळाली आहे. यामध्ये एकूण 11179 मतांचे लीड आहे.
12 व्या फेरीत जयश्री जाधव 1038 मतांनी आघाडीवर आहेत. जयश्री जाधव यांना 3946 नाना कदम यांना 2908 मते, जयश्री जाधव 9225 एकूण आघाडीवर
कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुकीत ८ व्या, ९ व्या आणि १० व्या फेरीत भाजपचे सत्यजीत कदम यांनी १६४३ मतांची आघाडी घेतली असली तरी ११ व्या फेरीत मात्र काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी ११४ मतांची आघाडी घेत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. ११ व्या फेरी अखेर ७८ हजार ४५४ मते मोजण्यात आली. त्यात जाधव यांना ४२ हजार ४७५ तर कदम यांना ३४३२८ मते मिळाली. जाधव यांच्या एकूण मतांची आघाडी ८ हजार १८७ जाली आहे. अद्याप ९३ हजार १०८ मते माजायची आहेत.
सम्राटनगर येथील जयश्री जाधव यांच्या घरी कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली आहे.