साप्ताहिक श्रमिक समाचार लाईव्ह : टपाली मतांतही जयश्री जाधवांची बाजी
 
कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत टपाली मतांत काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती जयश्री जाधव यांनी बाजी मारली. एकूण ६०४ टपाली मतांपैकी काँग्रेसच्या श्रीमती जयश्री जाधव यांना ३१५ एवढी तर भाजपचे सत्यजित कदम यांना २१४ मते मिळाली. दिव्यांग व ज्येष्ठ नागरीकांसाठी टपाली मतांची सोय करण्यात आली होती. यासाठी ६८८ मतदारांनी नोंदणी केली होती. या मतदारांच्या घरात जाऊन निवडणूक कर्मचाऱ्यांनी ही मते नोंदवली होती. ६८८ पैकी ६०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दहा पेट्यांतून ही मते स्ट्राँग रूममध्ये आणण्यात आली होती. मतमोजणीची सुरूवात या टपाली मताने झाली. त्यात काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी श्री. कदम यांच्यापेक्षा १०५ मते जास्त घेतली.