साप्ताहिक श्रमिक समाचार लाईव्ह : प्रवाशांसाठी खुशखबर! मिरज-कोल्हापूर पॅसेंजर उद्यापासून सुरू

 


मिरज : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूर-मिरज (Miraj-Kolhapur) पॅसेंजर रेल्वे (Railway) सेवा उद्यापासून (ता.१५) पासून पुन्हा सुरु होणार आहे. यामुळे कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवासांना दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने ही सुविधा सुरु केली आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर-मिरज मार्गावर पॅसेंजर रेल्वे सुरु केली आहे. मिरज-पंढरपूर मार्गावरही पॅसेजर सुरु करवी अशी प्रवाशांची मागणी केली आहे. कोल्हापूर-मिरज पॅसेंजर ही सुरुवातीला दोन वेळेत सुटणार आहे. मिरजेतून ही गाडी दुपारी २.१४ वाजता सुटणार असून ३.३० पर्यंत कोल्हापूर स्टेशनला पोहोचेल. तसेच सकाळी १०.३० वाजता कोल्हाराहून ही गाडी सुटून ११.४५ पर्यंत मिरज स्थानकात पोहोचणार आहे.

पॅसेंजर बंद असल्याने सामान्य प्रवाशांची गैरसोय होत होती. मिरजेतून नियमित नोकरी व्यवसायानिमित्त कोल्हापूरला जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोल्हापूर-मिरज मार्गावर पॅसेंजर सुरु करण्याची मागणी प्रवाशांनी आग्रही धरली होती. दरम्यान या मागणीला हिरवा कंदील मिळाला आहे.