कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur North Vidhansabha Bypoll Elections 2022) चुरशीची लढत होतं आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक ही 2024 च्या निवडणुकांची (Maharashtra State Assembly Elections 2022) लिटमस चाचणी असेल, असं म्हटलं जातं आहे. त्यामुळं यात कॉंग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप (Mahavikas Aghadi vs BJP) असा थेट सामना असल्यासारखी आहे. भाजपच्या देवेंद्र फडणवीसांपासून ते काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्यापर्यंत सगळ्यांनी या पोटनिवडणुकीत कोल्हापूर उत्तरचा मतदारसंघ पिंजून काढला आहे. कॉंग्रेसकडून जयश्री जाधव आणि भाजपकडून सत्यजित कदम हे दोन उमेदवार या निवडणुक रिंगणात होते. त्यामुळे आज कोण बाजी मारणार हा फैसला होणार आहे.
सम्राटनगर येथील जयश्री जाधव यांच्या घरी कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली आहे.
दहव्या फेरी अखेर जाधव यांना ३९, ६०५ मते तर कदम यांना ३१,५१२ मते मिळाली आहेत. ८०७३ मतांचे लीड आहे. 8 हजार मातांनी जयश्री जाधव आघाडीवर आहेत.
पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ९ व्या फेरी अखेर काँग्रेस उमेदवार ८ हजार ९५९ मतांनी आघाडीवर आहेत. ९ व्या फेरीमध्ये सत्यजीत कदम यांनी १९३ मतांची आघाडी घेतली. या फेरी अखेर एकूण ६५ हजार ९४२ मते मोजली असून या पैकी ३६ हजार ७३७ मते जाधव यांना तर २७ हजार ७७८ मते कदम यांना मिळालेली आहेत. अजूनही ९ व्या फेरीअखेर १ लाख १२ हजार ६०० मतांची मोजणी व्हायची
 
 
 
 
.jpg) 
