कोल्हापूर दि. २१ : जगताप नगर, पाचगाव येथे वरद फॅब्रिकेशन फर्म चे उदघाटन शेतकरी कामगार पक्षाचे कोल्हापूर शहर चिटणीस आदरणीय भाई बाबुराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना भाई बाबुराव कदम म्हणाले की, युवकांनी नोकऱ्यांच्या शोधात वेळ न घालवता स्वतःचा व्यवसाय सुरु करून नोकरी देणारे उद्योजक बनावे.
यावेळी फर्म चे पार्टनर युवा उद्योजक बाळकृष्ण जाधव, अवधूत कस्तुरे, पुरोगामी युवक संघटनेचे शहर अध्यक्ष इंजि. अभिजीत कदम, शेकाप महिला आघाडीच्या वैशाली सूर्यवंशी, गीता जाधव, सुलभा कस्तुरे, कावेरी मोटनवार, तसेच आनंदराव जाधव, बाळासाहेब लाड, प्रियांका झांबरे, लहू झांबरे, मुस्तफा बागवान इ. मान्यवर उपस्थित होते.
