कोल्हापूर दि. 21: भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कोल्हापूर शहरातील कार्यकर्ते व हितचिंतक यांचा व्यापक मेळावा शुक्रवार दि. 25/11/2022 रोजी सायंकाळी 4 वाजता शेतकरी कामगार पक्ष शहर कार्यालय टेंबे रोड, खासबाग, कोल्हापूर येथे बोलवण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये कोल्हापूर अर्बन बँके चे नुतन संचालक भाई संभाजीराव जगदाळे यांचा सत्कार करण्यात
येणार आहे. याचबरोबर या मेळावा प्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे कोल्हापूर शहरातील कार्यकर्ते व हितचिंतक शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. पक्षाच्या वतीने त्यांचा स्वागत समारंभ आयोजित केला आहे. तसेच पक्षाचे जिल्हा चिटणीस माजी आमदार भाई संपतराव पवार-पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्य आयोजित कार्यक्रमांचे नियोजन विषयी चर्चा करण्यात येणार आहे.
तरी सदर मेळाव्यास पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाचे शहर चिटणीस भाई बाबुराव कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.