पत्रकार -उत्तम कांबळे केनवडेकर
समाजातील स्त्रीयांच्या बाबतीत असणाऱ्या अनिष्ट रूढी आणि चुकीच्या प्रथा यांना फाटा देत केनवडेतील अनुराधा तुषार कांबळे यांनी स्वतः विधवा प्रथा मोडून गावामध्ये प्रथमच स्त्री प्रबोधनात्मक विचारांच्या पाया रचला. केनवडे मधील तुषार कांबळे यांचे रविवार दि.२०/११/२०२२रोजी दुःखद निधन झाले, त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही तुषार कांबळे यांच्या पत्नी अनुराधा यांनी स्वतःला दुःखातुन सावरत, पती निधनानंतर असणाऱ्या अनिष्ट विधवा प्रथेला बगल देत गावांमध्ये प्रथमच स्त्री सन्मानार्थ विचारांचा आदर्श पाया घातला.
