साप्ताहिक श्रमिक समाचार लाईव्ह: कोल्हापूर जिल्ह्यात आजपासुन तीन दिवस वादळी पावसाचा इशारा

 


कोल्हापुर प्रतिनीधी: कोल्हापूर शहरासह जिह्याच्या काही भागात बुधवार दि.15 पासुन दि. 17 पर्यंत वादळी पावसाची शक्यता आहे. शनिवारी दि. 18 रोजीही पावसाच्या हलक्या सरी बरसतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशा-या नुसार जिल्हा प्रशासनाने सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत. जिल्हयात गेल्या काही दिवसापासुन उष्मा वाढत आहे. वातावरण ढगाळ होत आहे. यामुळे अवकाळी पावसाची शक्यता आहे. उद्यापासुन तीन दिवस जोरदार वारे आणि विजेच्या कडकडाटासह दुपारनंतर पाऊस होईल असा अंदाज आहे. आजही उकाडा होता. दुपारी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत होती. कोल्हापुरात आज कमाल 35.5 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली. दुपारनंतर काही काळ वातावरण ढगाळ झाले. सायंकाळनंतरही हवेत उष्मा जाणवत होता.