साप्ताहिक श्रमिक समाचार लाईव्ह:हातकणंगले तालुक्यातील सिध्दोबा डोंगरावरील बिबट्या पिंज-यात जेरबंद

तासगाव प्रतिनीधी: हातकणंगले तालुक्‍यातील तासगावच्या सिद्धोबा डोंगरावर गेल्या अनेक दिवसांपासून वावर असलेला बिबट्या अखेर जेरबंद झाला. तो गोसंजीवनी गोशाळा तासगाव येथे लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या सापडला. सिद्धेश्वर डोंगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर गोशाळा कर्मचारी व स्थानिकांना दृष्टीस पडला होता. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने फेब्रुवारी महिन्यात तीन ते चार वेळा सापळा लावून मोहीम राबविली होती. तथापि त्यात त्यांना यश आले नव्हते. गोशाळा कार्यस्थळावर लावलेल॒या पिंजऱ्यात हा बिबट्या मंगळवारी (दि.५) रात्री उशिरा जेरबंद झाला. बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. 

बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. रेंज फॉरेस्ट ऑफिसर रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस एस जाधव, वन्यजीव बचाव पथकाचे अमोल चव्हाण, विनायक माळी, प्रदीप सुतार, आशुतोष सुर्यवंशी, अलमतीन बांगे, ओंकार काटकर आदींनी या बिबट्यास वनविभागाने आणलेल्या पिंजऱ्यात स्थलांतरित केले. कोल्हापूर वनविभागाच्या वाहनातुन सुरक्षितरित्या त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठीची कार्यवाही करण्यासाठी घेऊन गेले. स्थानिक डॉ. विजय पाटील, स्वप्नील पाटील यांनी वन्यजीव पथकाला सहकार्य केले.