श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंगचा प्रकार घडला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन काश्मिरी हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. शोपियाँ इथं हा अंदाधुंद गोळीबाराचा प्रकार घडला. यापूर्वी गेल्या दिवसांत सरकारी सेवेत असलेल्या हिंदू पंडितांना दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आल्या आहेत.
वारंवार होत असलेल्या या टार्गेट किलिंगमुळं काश्मीर खोऱ्यातील वातावरण तणावपूर्ण आहे. यापार्श्वभूमीवर काश्मीरमधील हिंदूंनी सरकारकडे सुरक्षेची मागणी केली आहे. यापूर्वी काश्मीरमधील टार्गेट किलिंगवरुन मोठ्या प्रमाणावर राजकारण झालं होतं. यावरुन अनेक राजकीय पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.
काश्मिरी पोलिसांनी या घटनेबाबत सांगितलं की, "शोपियाँमध्ये दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये एक नागरिक मारला गेला आणि एकजण जखमी झाला. यानंतर जखमी व्यक्तीला शोपियाँमधील अॅपल ऑर्किड रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं पण उपचारांदरम्यान त्याचाही मृत्यू झाला. ज्या दोघांवर हा हल्ला झाला ते दोघेही अल्पसंख्यांक हिंदू समाजातील होते"

 
 
 
 
.jpg) 
