पत्रकार-उत्तम कांबळे,केनवडेकर.
कागल तालुक्यातील केनवडे गावांमध्ये मागासवर्गीयांसाठी असलेले समाज मंदिर परिसर गेली कित्येक महिने लेखी तक्रार देऊन देखील ग्रामपंचायत कडून स्वच्छ झालेले नाही.
समाज मंदिर समोर असणाऱ्या गटारीमधून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याच्या ओघाने कचरा आत आलेला आहे. ग्रामपंचायतीने स्वच्छता कामी दुर्लक्ष केल्यामुळे त्या ठिकाणी सापांचा मोठ्या प्रमाणात वावर होत आहे .समाज मंदिराच्या हॉलमध्ये जाण्यासाठी असणारा मार्ग देखील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गवतामुळे बंद झालेला आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी समाजातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या परिसराची ताबडतोब स्वच्छता करावी अशी मागणी केनवडे येथील समाज बांधवा कडून होत आहे.
