साप्ताहिक श्रमिक समाचार लाईव्ह: शेकापतर्फे रविवारी आरोग्य शिबिर

 


कोल्हापूर प्रतिनीधी : शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्या अमृतमहोस्तवी वाढदिवसानिमित्त शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी व अथायु हॉस्पिटल यांच्या संयुक्त्‍ विदयामाने रविवारी दिनांक 4 राजी आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. शेकापच्या टेंबे रोड कार्यालयात सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत हे शिबिर होईल या शिबिरासाठी 3 डिसेंबर पर्यंत नावनोंदणी करावी लागणार आहे. शिबिरात ह्रदयरो, रक्तातील साखर, रक्तदाब, ईसीजी काढणे, नेत्ररोग, दंतरोग, तपासणी होणार आहे. या शिबिरात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन पक्षाचे शहर चिटणीस भाई बाबुराव कदम, वैशाली सुर्यवंशी, प्रमोदिनी जाधव, योगिता पाटील, शीतल पोवाळकर आदींनी केले आहे.