संतोष कांबळे (सावर्डे पा.) : साऱ्या जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६७ व्या जयंती निमित्त सावर्डे पा. येथील सम्राट अशोक नगर गल्ली नं.२ मधील बौध्द विहारात महाकारूणीक भगवान बुद्ध तसेच महापुरुषांना भीम क्रांती तरुण मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
वैशाख शुद्ध पौर्णिमेला सिद्धार्थ अर्थात गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले. म्हणून ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमेच्या रुपाने साजरी होते. त्याचे औचित्य साधून भीम क्रांती तरुण मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी शेतकरी संघाचे नूतन संचालक म्हणून निवड झालेले मा. मधुकर कांबळे (कासारवाडा) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याच वेळी समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरेश कांबळे यांनी केले या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भारतीय बौध्द महासभेचे सदस्य आयु. शिवाजी कांबळे यांनी समाजाला 'बुध्दाच्या मार्गावर जाण्याची गरज आहे.' हा बहुमोल मंत्र आपल्या मार्गदर्शनातून दिला.
या कार्यक्रमासाठी गावचे ग्रामपंचायत सदस्य आयु. आनंदा बळवंत कांबळे , माजी सरपंच परसु यल्लाप्पा कांबळे ,भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य शिवाजी यलाप्पा
कांबळे तसेच भीम क्रांती तरुण मंडळाचे उपाध्यक्ष सुजित सुनील कांबळे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
