साप्ताहिक श्रमिक समाचार लाईव्ह: मिरज मधील नॅशनल हायवे वर ट्रॅक्टर व बॉलेरो यांचा भीषण अपघात



(संतोष कांबळे) :  पंढरपूर मधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र विठ्ठल मंदिर  येथे दर्शनासाठी निघालेल्या प्रवाशांवर आज सकाळी १०:३०  च्या सुमारास ट्रॅक्टर व बॉलेरो यांच्या भीषण अपघात  देव दर्शनासाठी निघालेल्या प्रवाशांवर काळाने घाला घातला.या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला  याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज दिनांक १७मे रोजी सकाळी कृष्णा घाट रोड मिरज येथील नॅशनल हायवे १६६च्या ओवर ब्रिजच्या पूर्वेस सुमारे १किमी अंतरावर बॉलेरो गाडी नंबर MH 09 DA 4912  व  विटांनी भरलेला ट्रॅक्टर ( नंबर :MH 10 DG 8683 यांची सामोरासमोर जोराची धडक झाल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. 
      यामध्ये मयत झालेल्या व्यक्तींची नावे अशी, १) श्री.उमेश उदय शर्मा (वय २२ रा. शेळेवाडी , कोल्हापूर) २)श्री.जयवंत दत्तात्रय पोवार ( वय ४२ वर्षे, रा. सरवडे) ३)   श्री.लक्ष्मण शंकर शिंदे ( वय ७० वर्षे , रा. बानगे) , ४) विमल श्रीकांत शिंदे ( वय ५६ वर्षे रा. रोहिदास नगर इचलकरंजी ) ५) सौ. स्नेहल जयवंत पोवार ( वय ४० वर्षे रा. सरवडे) ६) कु. सोहम जयवंत पोवार ( वय १२ वर्षे रा. सरवडे) तर जखमी असणारी १) कु. साक्षी जयवंत पोवार ( वय १७ वर्षे , रा. सरवडे) २) कु. श्रावणी जयवंत पोवार ( वय १५वर्षे , रा. सरवडे)  यांच्यावर सिविल हॉस्पिटल मिरज येथे उपचार सुरू आहे. 
      एकाच कुटुंबातील ५ लोकांवर काळाचा घाला; सरवडे गावात पसरली शोककळा
      या भीषण अपघातात सरवडे गावातील जयवंत पोवार यांचे कुटुंब काळाच्या पडद्या आड गेल्याने सरवडे तसेच पंचक्रोशीतील भागात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबातील सर्वच व्यक्तींचे अचानक झालेल्या निधनाने सर्वत्र दुःखाचे सावट पसरले आहे .