केनवडे प्रतिनिधी
आरक्षणाचे जनक व शोषित पीडितांचे कैवारी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती केनवडे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये साजरी झाली.
त्यांनी त्यांच्या संस्थानिकात सर्व जाती-धर्माची मुले सुशिक्षित व शिक्षित झाली पाहिजे यासाठी अविरत प्रयत्न केले, प्रत्येक जातीचे वस्तीगृह त्यांनी निर्माण केले व जे शिक्षणापासून वंचित होते त्यांना शिक्षण मिळवून द्यायचा खऱ्या अर्थाने पाया शाहू महाराजांनी घातला. जातीयतेची विषवल्ली त्यांनी मुळापासून संपवून समानतेची वागणूक सर्वांना दिली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे हे पहिले राजे होते. अशी दूरदृष्टी असणारे छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य अतिशय महान आहे.
या जयंतीप्रसंगी केनवडे गावच्या विद्यमान सरपंच सौ.अनुराधा शिंदे , महादेव मगदूम, सचिन पाटील, शिवाजी पाटिल, पांडुरंग शेणवी, नामदेव सुतार, शशिकांत शिंदे व ग्रामस्त उपस्थित होते
