पंढरपूर प्रतिनिधी
वारकरी, विठ्ठलभक्त ज्या सोहळ्याची, ज्या तिथीची अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात, तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी. वारकरी आणि त्यांचा पांडुरंग यांच्यात आता केवळ एक दिवसांचं अंतर राहिलं आहे. एवढे दिवस पायी वारी करून आलेल्या, दमलेल्या थकलेल्या डोळ्यांना आता विठूदर्शनाची आस लागली आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठोबाचं 'याचि देहि याचि डोळा' दर्शन घेता येणार आहे. महाराष्ट्रातल्या परंपरेनुसार, आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडते. यावेळी एका वारकरी दांपत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळतो. पण कोणत्या वारकऱ्याला मान द्यायचा हे कसं ठरतं?कोण ठरवतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.
१९७३ पासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा केली जाते. त्यांच्यासोबत हे वारकरी दांपत्य उपस्थित असतं. हे मानाचे वारकरी ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे मंदिर समितीला असतो. विठ्ठलाची पूजा ही पहाटे पार पडते. त्यावेळी मुख्यमंत्री मंदिरात दाखल झाले की मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. त्यानंतर पूजेची तयारी सुरू होते.यावेळी दर्शन रांगेत सर्वात पुढे असणाऱ्या दांपत्याला हा मान मिळतो. जे दांपत्य दर्शनरांगेत समोर असेल, त्यांना पूजेसाठी बोलावलं जातं. शिवाय मंदिर समितीतर्फे त्यांचा सत्कारही केला जातो.
पंढरपूर नगरी आषाढी एकादशी सोहळ्यासाठी सज्जराज्यातल्या विविध भागांसह कर्नाटक आणि तेलंगणामधूनही आता लाखो भाविकांचं पंढरीमध्ये आगमन होत आहे. आषाढी एकादशी सोहळ्यामध्ये सामील होण्यासाठी निघालेल्या मानाच्या सगळ्या पालख्यांचं पंढरपूरजवळच्या वाखरी पालखी तळावर आगमन झालं आहे. पंढरीतले मठ, लॉज, विठ्ठर रुक्मिणी मंदिर समितीचे भक्तनिवास गर्दीने भरुन गेले आहे. विठ्ठलदर्शनासाठी रांग लावून असलेल्या भाविकांना मंदिर समितीच्या वतीने तांदळाच्या खिचडीचं वाटप करण्यात आलं.
आषाढी एकादशी मुहूर्तआषाढ महिन्यातील देवशयनी एकादशी 29 जून रोजी पहाटे 3:18 वाजता सुरू होईल आणि 30 जून रोजी दुपारी 2:42 वाजता समाप्त होईल.भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे आषाढी एकादशी गुरुवार २९ जून २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे.
.jpeg)