दर्शन पवार हत्याप्रकरण त्यानंतर काल सदाशिव पेठेत तुरुणीवर कोयत्याने हल्ला या घटना ताज्या असतानाच देवनार मध्ये दोन महिलांवर चाकू हल्ल्याची घटना समोर आलेली आहे. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झालाय.
मुंबई येथली देवनार येथे दोन महिलांवरती चाकू हल्ल्या झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. काजल भोसले असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून वैशाली पवार ही महिला जखमी आहे.यांच्यातल्या भांडणाचा कारण अद्याप समजू शकलो नसून याप्रकरणी देवनार पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतला आहे
महिला तुरुणी यांच्यावरील हल्ल्याच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. काल पुण्यात एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. तर काही दिवसांपूर्वी लग्नाला नकार दिल्याने एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवार हिची हत्या झाल्याची घटना घडली.
तर आज एका महिलेने तरुणाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडलीये. लग्न करण्यास नकार दिल्यामुळे महिलेने चक्क तरुणाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणाने लग्नास नकार दिल्याने या महिलेने २ जणांना सुपारी देत तरुणाचे अपहरण केले. (Latest Marathi News) पुण्यातील कोंढवे धावडे परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी एका महिलेसह प्रथमेश यादव, अक्षय कोळी यांना अटक करण्यात आली आहे.
.jpeg)