राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. काही भागांमध्ये थंडी जाणवू लागली आहे. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. तर राज्यात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. देशासह राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यासह देशात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. राज्याच्या अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे. राज्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात थंडी पडण्यास सुरुवात झाली असून नोव्हेंबरच्या शेवटी थंडीचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी लावली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. दरम्यान, आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईसह, पुणे, सातारा आणि कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी रविवारी तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
