साप्ताहिक श्रमिक समाचार लाईव्ह :केनवडे तालुका कागल येथे भैरवनाथ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा



 केनवडे गावातील भैरवनाथ देवालयामध्ये आज भैरवनाथ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळपासून मंदिर परिसरात रांगोळी काढण्यात आली होती.देवालाया सभोवती सुशोभीकरण करण्यात आले होते.गावातील श्री विठ्ठल पंथी भजनी मंडळ व श्री दत्त पंथी संगीत भजनी मंडळ यांनी भजन सेवा केली.   सर्वांनी गुण्यागोविंदाने दुपारी प्रसादाचा आस्वाद घेतला आज भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त गावामध्ये कडकडीत पाळक पाळण्यात आला होता या उत्सवाला माघारणीसह गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.